संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र
—__—प्रस्तावना—_—_—_—_—_—_—_—_—_—_—_—_—_—_—_
महाराष्ट्रातील महान संता पैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज होय.त्यांचा जन्म देहुगाव मध्ये झाला.ते गावचे महाजन व सावकारही होते. दुकानाचा व्यवसायही होता.त्यामध्ये त्यांना विठ्ठल भक्ती चे जणू वेडच लागले.विठ्ठल नामस्मरणात तल्लीन आसत.त्यानी विठ्ठलावर अभंग रचले.सोबत समाज हिता साठी,सामज प्रबोधनावर ही अभंग रचले. त्याचे काही अभंग मवाळ तर काही उग्र आहे.४००० पेक्षा अधिक अभंग रचना केली आहे.त्यांच्या विषयी माहिती.
_____________________________________________________________
–__—–__––—परिचय——__—__—__—__—__—__—__—__—
नाव -संत तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म- माघ शुद्ध ५, शके १५२८, (१ फेब्रुवारी १६०७)देहू,महाराष्ट्र
निर्वाण- फाल्गुन कृ २ , शके १५७१, (७ मार्च १६५०)
देहू,महाराष्ट्र
आईचे नाव- कनकाई बोल्होब अंबिले
गुरु- नामदेव महाराज
_____________________________________________________________
देहू गावांमधील वणी,सावकार बोल्होबा आंबिले व त्यांची पत्नी कनकाई यांना माघ शुद्ध ५, शके १५२८, (१ फेब्रुवारी १६०७). रोजी त्यांना मुुलगा
झाला तो मुलगा म्हणजे संत तुकाराम महाराज होय.
तुकारामांना तुकोबा ही म्हणतात.तर वारकरी सांप्रदायात आदराने जगद्गुरू असे म्हणतात. तुकोबाच्या घरात सुख, समृद्धी,पिढीजात असलेली श्रीमंती ही नांदत होती. तुकोबांचा मोठा भाऊ सावजी हा घरात वडिलांच्या व्यवसायात काही लक्ष देत नव्हता.व कान्होबा आजुन लहान होता.त्या मुळे घरची सारी जबाबदारी लवकरच तुकोबांवर आली.
∆∆∆
पहिला विवाह हा रकमा सोबत झाला.संतू नावाचा मुलगा ही झाला परंतु हे सुख जास्त दिवस टिकले नाही.घरात एका मागे एक विघ्न आले.तुकोबा अठरा वर्षेचे असतानाच यांचे आई वडील वारले.त्या पुढे भयंकर दुष्काळ पडला.त्यात त्यांचा मुलगा संतू मरण पावला पाटो पाट त्यांची पत्नीही वारली. त्यांचा दुसरा विवाह आवली सोबत झाला. दुष्काळा मुळे सावकारी संपण्याच्या मार्गावर आली. देणेदारी वाढली.तुकोबा हताश झाले पुढे त्यांना विठ्ठल भक्ती ची ओढ निर्माण झाली.
जुने विठ्ठलाचे मंदिर नव्याने स्थापन केले.विठ्ठल भक्तीत तलीन झाले.घरी पत्नीच्या त्राग नंतर ते भंडारा डोंगरावर जाऊन नामस्मरण करत. तिथे त्यांना विठ्ठलाचा दृष्टांत झाला.एके दिवशी नामदेव महाराजांनी स्वप्नात येऊन अभंग रचना करण्यास सांगितली, ज्ञानदेवांनी ज्या वारकरी सांप्रदायाचा पाया रचला त्या मार्गाने चालायला सांगितले.आता तुकोबा पूर्णपणे विठ्ठल भक्तीत दंग झाले.त्यांना कसलेच भान उरले नाही. घरचीही चिंता राहिली नाही.लोक त्रास देत तर ते भंडारा डोंगरावर जात.त्यानी विठ्ठलावर,श्री कृष्णा अभंग रचले.सोबत समाज हिता साठी,सामज प्रबोधनावर ही अभंग रचले. भंडारा डोंगरावरील निसर्ग पाहून ते म्हणत.
•|| वृक्षल्ली आम्हां सोयरीं वनचरें ||•
• || पक्षीही सुस्वरें आळविती ||•
∆∆∆
एके दिवशी तुकोबांची कीर्ती ऐकून खुद छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी आले.व त्यांचा वर प्रसन्न होऊन त्यांना सोन्याच्या मोहरा, दागिने भेट दिली पण त्याने ते स्वीकारले नाही.ते भक्ती मार्गाला लागल्या मुळे त्यांना सोन्या दागिन्यांचे महत्त्व उरले नव्हते. राजेही तुकोबांच्या कीर्तनात दंग झाले.
∆∆∆
ते कीर्तन करत त्यांचे कीर्तन ऐण्यासाठी दूरवरून लोक येत.
विठ्ठलाचे, ज्ञानदेव,नामदेव, एकनाथांचे कीर्तन करत होते. अभंग ऐकून सर्व लोक तल्लीन वहत. तुकोबा समाजहित साठी अभंग रचत देवालाप्रसन्न करण्यासाठी देवपुजाची गरज नाही असे त्यांनी सांगितले.त्यांची किर्ती पाहून गावचे रामेश्वर भट व मुंजबा यांना वाटले आपल्या कडे कोणीही येणार नाही.ते तुकोबांचा तिरस्कार करू लागले. त्यांनी तुकोबांना अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यास सांगितली.
काही लोकाच्या म्हण्यानुसार गाथा पंधरा दिवसांनी पुन्हा वर आली.तसे झाले नसले तरी तुकोबांची कीर्ती सर्वदूर पसरली होती त्याचे अभंग सर्वांना पाठ होते.त्यामूळे त्यांनी पुन्हा अभंग रचना केली.मग आखेर रामेश्वर भट व मुंजबानी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. तुकोबांची शिषा जनाबाई म्हणतात.
•||ज्ञानदेव रचिला पाया ||•
•||तुका झालासे कळस||•
∆∆∆
फाल्गुन कृ २ , शके १५७१, म्हणजेच (७ मार्च १६५०) रोजी
त्यांना पुष्पक विमान नेण्यास आले व ते त्या मध्ये बसून वैकुंठास निघून गेले.त्यांनी
शेवट पर्यंत अभंग रचले व जाता जाता म्हणाले
•||आम्ही जातो आपुल्या गावा||•
•||आमचा राम राम घ्यावा||•
संत तुकाराम महाराज मंदिर (देहू).
★ ★ ★
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Share and comment