संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र





-----------------------------------•प्रस्तावना•-----------------------------------------                                        महाराष्ट्रातील महान संत म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी समाज हिता साठी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी,हरिपाठ,अभंग लिहिले. जगातील सर्वांसाठी पसायदान मागितले.
ज्ञानेश्वरांन बदल काही माहिती वाचली, काही ऐकली त्या नुसार थोडक्यात माहिती लिहिली आहे.
————————————————————————————












                   

_______परिचय_________________________________________________
•संत श्री ज्ञानेश्वर महाराज (१२८५ ते १२९६)
•जन्म -श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५)  
•समाधी -(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार) आळंदी देवाची
•वडिलांचे नाव- विठ्ठलपंत कुलकर्णी
•आई चे नाव- रुक्मिणीबाई कुलकर्णी
•गुरु-संत श्री निवृत्तीनाथ
_____________________________________________________________

                  संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म आळंदीत का आपेगावाला झाला या बदल थोडा मतभेद आढळतो. परंतु आपेगाव हे च जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
 असो, त्या बदलची योग्य ती माहिती काढली की लिहिलं.
                 संत ज्ञानेश्वर महारजांना लाडाने माऊली असे म्हणतात.कारण आई जशी मुलांवर प्रेम करते,तिला आपल प्रत्येक मूल समान असतं तसचं ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेम करतात. व त्याच्या अभंगातून भक्तांना
भक्तिभवाचा,प्रेमाचा, समानतेचा संदेश देतात. माऊली म्हणतात की                                                       •||हे विश्वची माझे घर||•
त्यांनी हा थोर विचार मांडला.त्यांनी जगातील सर्व माणसांसाठी, प्राणीामात्रां साठी पसायदान मागितले.ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी,हरिपाठ,अभंग लिहिले. माऊलीचे मराठी भाषेवर खूप प्रेम होते.
                        •||माझ्या मराठीचे बोलू कौतुके ||•
                          •||परी अमृताचे ही पैजा जिंके||•

त्यानी अशा गोड आभंगातून मराठीवरचे प्रेमवक्त केले दिसते.
सामान्य लोक , ज्यांना संस्कृत भाषा समजत नव्हती, ज्यांना गीता वाचून दिली जात नव्हती. अशा लोकांना साठी त्यांनी गीता मराठी मध्ये लिहिली. ती भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी होय.लहान वयातच त्यांनी मोठे तत्वज्ञान सांगितले.
           जगातील प्रसिद्ध खेळा पैकी एक व लहान मोठ्याना आवडणारा खेळ म्हणजे साप शिडी.खूप कमी लोकांना माहिती असेल की साप शिडी खेळाचा शोध हा संत ज्ञानेश्वरांनी लावला आहे. माऊली व निवृत्तीनाथ हे जेव्हा भिक्षा मागण्यासाठी जात तेव्हा लहान मुक्ताई व सोपान साठी या खेळा ची निर्मिती केली. तेव्हा या खेळाचे नाव मोक्षपट होते.हा खेळ फक्त खेळ पुरता नसून त्या मध्ये जन्म व मृत्यू चा अर्थ सांगितला होता.त्या मध्ये सर्वात म्हणजे जन्म शेवट म्हणजे मोक्ष. पाप हे साप म्हणून दाखवले.की त्यामुळे आपण आजुन आडकत जातो. व पुण्य म्हणजे शिडी होय.त्यामूळे खेळ हा लवकर संपतो. त्यांनी खेळा च्या माध्यमातून ही जीवन जगण्याचा अर्थ दिला.पण या काळात हा खेळ खेळा पुरता मर्यादित राहिला आहे.

                     पण माऊलींना सुरुवातीच्या आयुष्या मध्ये खूप संघर्ष करावा लागला.त्यांच्या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकले. त्यांच्यावर भिक्षा मागण्याची पाळी आली.पण का? कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता.पण गुरुच्या आज्ञेवरून ते पुन्हा आळंदीला येऊन संसाराला सुरुवात केली. नंतर त्यांना ३ पुत्र, १ कन्या रत्न प्राप्त झाले.त्यांची नावे आनुक्रमे निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई.
                      एखादी व्यक्तीनी संन्यास घेतला व त्यानंतर गुरूच्या आज्ञेप्रमाणे तो पुन्हा संसार करू शकतो.पण आळंदीतील धर्म सभेला हे मान्य नव्हते.त्या काळात धर्म सभेचा निर्णय अंतिम राहत व तो सर्वांना मान्य करावा लागत. त्यांच्या निर्णया
 नुसार विठ्ठलपंतच्या कुटुंबाला वाळीत टाकले.
                      त्यांना कोणी तरी सांगितले की ब्रहामगिरीची प्रदक्षिणा करा.त्यानुसार प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व कुटुंब निघाले.वाटे मध्ये जात असताना त्यांच्या मागे वाघ लागला. सर्व जणांची पळापळ होती .त्यामध्ये निवृत्ती महाराज चुकतात ते एका गुहेत जातात.गुहेत एक योगी तपश्चर्या करत होते.ते योगी म्हणाले हा वाघ माझाच होता.तू या गुहेत यावं यासाठी मी हे सर्व केलं.पण तुम्ही कोण ?निवृत्ती महाराज म्हणाले.मी गोरखनाथांचा शिष्य गहिनीनाथ.माझ्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे तुला व तुझा भाऊ ज्ञानेश्वराला भागवत संप्रदाय बरोबर नाथ संप्रदायाचा प्रसार करायचा आहे.त्यामुळे निवृत्ती महाराजानी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली.त्यानंतर निवृत्ती महाराजांना निवृत्तीनाथ म्हणून ओळख जाऊ लागलं. निवृत्तीनाथ पुन्हा आपल्या कुटुंबाकडे जातात.
                                                                                                    ∆∆∆               
               आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पुन्हा धर्मपीठा कडे दाद मागितली.त्यावर धर्मपीठाचे मुख्य विसोबानीं त्यांना देहांत प्रायश्चितची शिक्षा झाली.मुलांसाठी त्यांनी इंद्रायणी मध्ये उडी मारून जीव दिला. तरी ही ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांना समाजाने स्वीकारले नाही.त्यांची मुंज ही करून दिली नाही.
                                                                                                 ∆∆∆
                       ज्ञानदेव व त्याचे भावंडे शुध्दी मिळवण्यासाठी मजल दर मजल करत पैठणला गेले. तिथील धर्मपीठकडे आम्हाला शुद्ध करून घ्या अशी मागणी केली.परंतु ती त्यांनी अमान्य केली. माऊलींनी तिथे रेड्या मुखी वेद बोलविला तो चमत्कार पाहून पैठणवासी व धर्मपीठ आश्चर्यचकित झाले.व तिथींल प्रमुखांनी शुध्दी पत्र  दिले.व ते भावंडे आळंदीला आले.ते शुध्दी पत्र विसोबांना दिले.पण त्यांनी ते फाडले. व त्यांचा स्वीकार केला नाही. ते पुन्हा भिक्षा मागण्यासाठी गेले तर त्यांचा वर चिखल, दगड फेकले जात.या सगळ्या वर नाराज झाले. माऊली आपल्या झोपडी कडे गेले.झोपडीचे दार बंद करून एकटेच आत जाऊन बसले.त्यावर लाहानशा मुक्ताबाई नी ज्ञानदेवाना समजून सांगितले.त्या वेळीं मुक्तताईनी ज्ञानदेवसाठी हा अभंग म्हंटला
                                    •|| चिंता क्रोध मागे सारा ||•
                                      •|| ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||•
                       माऊलींनी ठरवलं की आजही हा समाज कर्म, कांड, आनिष्ट , रुढी, परंपरेवर अवलंबून आहे. त्यांच्या मध्ये प्रबोधन केले पाहिजेन.समानतेचा दृष्टिकोन व ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजेन.त्यासाठी एक वेगळ्या समजा, संप्रदाय निर्माण झाला पाहिजेन असे त्यांच्या मनात आले.मग त्यांनी वारकरी सांप्रदयाचा पाया घातला.
                                                                                                ∆∆∆
                     
                       काही काळाने ते व त्यांचे भावंडे देव दर्शन करीत नेवासेला गेले सामान्य माणसाला संस्कृत मधील गीतेचे मराठी भाषांतर केले व आवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानदेवांनी सांगितली व सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली. ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्या खांबाला पैस खांब असे म्हणतात .तो खांब आजही आहे व तिथे त्याचे मंदिर आहे.
 पुढे ते आळंदीला आले. अनेक अभंग,हरिपाठ त्यांनी लिहिले. ईश्वर हा निराकार निर्गुण आहे.त्याल प्रसन्न करण्यासाठी फक्त त्याचे नामस्मरण करीत रहा.असा संदेश दिला.
                                                                                               ∆∆∆

                          एके दिवशी मुक्ताबाईला मांडे खाऊशी वाटले, मांडे भजण्यासाठी मडके भेटत नव्हते.व कोणीही दिलेसुधा नाही.मग माऊली म्हंटले तू माझा पाठणी वर मांडे भाज. त्यानंतर माऊलीनी आपल्या महान योगा शक्तीने पाठ गरम केली.त्यावर मुक्ताई ने मांडे भाजले.हे सर्व विसोबानी पाहिले व त्यांना आपली चूक लक्षात आली आपण या मुलांना लहानपणा पासून त्रास देते आलो.त्यांना वाळीत टाकलं. त्याचा आई वडीलाना देहांत प्रायश्चित करण्यास सांगितले.चूक कळताच त्यांनी ज्ञानदेव व त्यांच्या भावंडंची पाय धरून माफी मागितली.
                                                                                                ∆∆∆   
       
                          चौदाशे वर्ष जगलेले योगी चांगदेव महाराज त्यांना खूप आहांकर होता.ते माउलींना कमी लेखत होते.त्यांनी माऊलींची कीर्ती ऐकून त्यानी
माऊलींची भेट घेण्याचे ठरवले. भेटी आधी पत्र लिहावे असे त्याना वाटले.परंतु पत्रात काय लिहिवावे कशी सुरुवात करावी त्यांना कळेना मग त्यांनीं पत्र कोरेच पाठून दिले.माऊलीनी त्यांची मनःस्थिती ओळखली व त्यांना योग्य ते उत्तर दिले.मग चांगदेव महाराज आपले सारे वैभव दाखविण्यासाठी ते वघावर बसून शेकडो भक्तगणा सोबत निघाले.हे माऊलींना कळाले मग माऊली म्हंटले की चांगदेव महाराज थोर योगी आहे. आपुनच त्यांच्या भेटी साठी गेले पाहिजे.मग त्यांनी निर्जीव भिंत चालवली त्यावर बसून गेले. ज्ञानदेवाचा
चमत्कार पाहून चांगदेवना त्यांना यांची चूक कळाली .त्यांचा सारा अहंकार मिटला व ते ज्ञानदेवाच्या पायाशी लोटांगण घातले.
                                                                                                  ∆∆∆
                       माऊलीचे समाज प्रबोधन चालूच होते.त्यांनी वारकरी सांप्रदायाचा पाया रचला. त्याचा प्रसार केला.त्या बरोबर नाथ संप्रदायचाही प्रसार केला.
त्यांना कळाले आपुले जीवित कार्य पूर्ण झाले आहे.आता आपण संजीवन समाधी घेतली पाहिजे.त्याचा गुरु म्हणजे निवृत्तीनाथ कडे परवानगी मागण्या साठी गेले. ज्ञानदेव लहान भाऊ आहे त्याला समाधी ची परवानगी कशी देऊ .तो आजुन लहान आहे.निवृत्तीनाथाच्या मनात आले त्याचे हृदय भरून आले.माउलींना कसे समजून सांगावे कळत नव्हते. माऊलींचे मन परिवर्तन करण्या साठी ते व ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे सर्व ब्रहामगिरी च्या प्रदिक्षणा मरण्या साठी गेले.मग ते सर्व पंढरपूरला ही गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. तिथे नामदेव महाराजांची भेट झाली.
                 
     माऊलींनी समाधी घेण्याचा निश्चयच केला होता.ज्ञानदेव समाधी घेणार हे कळताच साऱ्या लोकांना अश्रू आनावर झाले.सारे आसमंत गहिवरले.चांगदेव महाराज ,नामदेव महाराज, निवृत्तीनाथ,सोपान, मुक्ताबाई यांच्या साक्षीने
 (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). आळंदीला सिद्धेश्वराच्या मंदिरा समोर इंद्रायणी काठी अवघ्या ऐकिसाव्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली.
यावर नामदेव महाराज म्हणतात.
                             •|| नामा म्हणे आता लोपला दिनकर ||•
                                  •|| बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्थ ||•
                                     
       
(संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर.आळंदी देवाची)
★ ★ ★















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Indian philosopher Sant Tukaram Maharaj biology

संत नामदेव महाराज जीवन चरित्र माहिती